marathidrama.com


मराठी नाटके हा मराठी भाषिकांचा आवडीचा तसेच जिव्हाळ्याचा विषय आहे.
नाट्यकला हे जिवंत कला आहे एखादा सिनेमा टीव्ही अथवा थिएटरवर पाहण्यापेक्षा एखाद्या नाट्यगृहामध्ये
नाटकाचा प्रयोग पाहणे एक अद्वितीय अनुभव आहे

नाट्यकला ही जगली पाहिजे कारण एखादा कलाकार स्टेजवर जिवंत परफॉर्म संगीताचा देतो गाणे म्हणतो व ते गाणे विशिष्ट रागामध्ये गातो त्याला लाईव्ह संगीत दिले जाते अशा टाईपच्या जिवंत परफॉर्मन्सला पुढच्या काळात
पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही.
म्हणून लोक कला लोकसंगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत ,नाटके अशा प्रकारच्या लाइव परफॉर्मन्स कला जगल्याच पाहिजे.

मुंबईमध्ये चेंबूर ,कुर्ला, गोवंडी, लालबाग, भायकाळा, अंधेरी ,गोरेगाव मालाड, दहिसर, विक्रोळी, पवई अशा मुंबईतील
बहुसंख्य मराठी भाषिक असलेल्या भागात सुद्धा त्यांना नाटक पाहायचे असले तर दादर, गिरगाव, बोरीवली ,ठाणे
या भागात कोणते नाटक कुठे लागले आहे अथवा लागणार आहे त्यावर नाटक पाहण्याचा मोठा बेत करावा लागतो.

आणि मुंबई बाहेरील परिस्थिती आणखी कठीण आहे तेथे जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी अथवा तालुक्याला मध्ये नाटक लागते पण गावांमध्ये प्रेक्षकांना कुठले नाटक कुठे लागले याची माहिती नसते म्हणजे पुष्कळ लोकांना इच्छा वगैरे असतानासुद्धा नाटक पाहू शकत नाहीत.

मुंबई बाहेर आणि मुंबई सुद्धा पुष्कळशा मराठी लोकांना वेळ, पैसा आणि आवड असूनही मराठी नाटके
पाहता येत नाहीत.
मराठी नाटकांची माहितीवजा जाहिरात दोन-तीन वर्तमानपत्रात येते व त्या
वर्तमानपत्रांमधून सुद्धा अमुक एक नाटकाप्रमाणे अमुक एक नाट्यगृहाप्रमाणे अमुक एक तारखे वेळेप्रमाणे
नाटक शोधण्यास आपल्याला भरपूर कसरत करावी लागते.

आमच्या सर्वेक्षणानुसार 80% मराठी भाषिक इच्छा, पैसा, वेळ असताना सुद्धा नाटके पाहू शकत नाहीत

*मराठी नाटकांची वर्तमानपत्रातील जाहिरात ही काही एक-दोन वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जाते

*हीवर्तमानपत्रातीलजाहिरातकृष्णधवलस्वरूपातअसते
*वर्तमानपत्रातील जाहिरात मोजक्याच प्रेक्षकांपर्यंत जाऊ शकते.
*या वर्तमानपत्रातील नाटकांच्या जाहिरातींद्वारे वेळ आणि स्थानानुसार आवडते नाटक शोधणे कठीण जाते.

फेसबुक वरील जाहिरात ही अतिशय काही लोकांपर्यंत पोहोचते,
आणि ज्यांना नाटक पाहायचे नाही त्यांच्याकडे सुद्धा जाते

इंटरनेटवर www.marathidrama.com वर ठेवलेल्या जाहिराती या जगभर
तसेच महाराष्ट्रभर कॉम्प्युटर तसेच स्मार्टफोन द्वारे लाखो प्रेक्षकांकडे जातात.
www.marathidrama.com वर जाहिराती ह्या उत्तम पद्धतीने
आणि आकर्षक रंगीत स्वरूपात असतात.
www.marathidrama.com वरील जाहिराती अत्यंत अल्पदरात असतात

ज्याला नाटक पहावयाचे असेल त्याच्याकडे सहज पणे जाहिरात जाते

आज-काल सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळे नाटकांची माहिती जाहिराती किंवा नाट्य परीक्षण
हे वेबसाईट द्वारे प्रकाशित केल्यास महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांपर्यंत सहजपणे जाऊ शकते.
त्यामुळे मराठी नाटकांची प्रेक्षक संख्या सुद्धा कित्येक पटीने वाढू शकते
म्हणून आम्ही नाट्यप्रेमींनी www.marathidrama.com ही वेबसाईट सुरू केली आहे.
या वेबसाईटवर मराठी नाटके अथवा मराठी अन्य कार्यक्रम कुठे ,केव्हा, कोणते असतील याची माहिती असेल.
मराठी करमणूक क्षेत्रातील कलाकारांची माहिती असेल मराठी नाटकांची नाट्य परीक्षणे, नवीन नाटकांची
माहिती, नाट्य क्षेत्रातील घडामोडी अथवा अन्य माहिती असतील.
म्हणजेच प्रचंड खर्च करून वर्तमानपत्र मध्ये मराठी नाटकांची जाहिरात करण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षक खेचण्यासाठी www. marathidrama.com वर प्रभावशाली जाहिरात करून आपले बजेट नियंत्रित करणे.
ही www.marathidrama.com ही वेबसाईट संपूर्णपणे नाट्य क्षेत्राच्या प्रगतीसाठी
आणि उत्कर्षासाठी क्रांतिकारी पाऊल ठरू शकते

या www.marathidrama.com वेबसाइटद्वारे प्रेक्षकांना आपल्या जवळच्या नाट्यगृहात आवडीच्या नाटकाचा प्रयोग कधी होणार आहे हे समजू शकते

या www.marathidrama.com वेबसाईट द्वारे प्रेक्षकांना आपल्याला सोयीस्कर असलेल्या तारीख व वेळेनुसार आवडीच्या नाटकाचा प्रयोग कोणत्या नाट्यगृहात होणार आहे हे समजू शकते.

या www.marathidrama.com वेबसाईटवर कलाकार किंवा मेकअप आर्टिस्ट अथवा नाट्यक्षेत्रातील कोणीही आपला प्रोफाईल अथवा पोर्टफोलिओ प्रकाशित करू शकतात त्यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची जरुरी नाही अथवा कुठलेही मूल्य आकारले जाणार नाही.

या www.marathidrama.com वेबसाईट वर नाट्य परीक्षण ,नाट्य पुरस्कार बद्दल माहिती अथवा नाट्यक्षेत्रा संबंधित कोणतीही बातमी प्रकाशित करू शकतात त्यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची जरुरी नाही अथवा कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही

जर आपल्याला ह्या www.marathidrama.com वेबसाईट ची कल्पना आवडली असेल तर या www.marathidrama.com
वेबसाईट ची लिंक नाट्यप्रेमी किंवा आपल्या मित्रमंडळींना पाठवून द्या.

आम्हास विश्वास आहे की अधिकाधिक मराठी नाट्य प्रेमींचे सहभाग लागले तर
www.marathidrama.com ही वेबसाईट मराठी नाट्य क्षेत्रात प्रगती महत्त्वाचा टप्पा असेल
व पुढील काळात आता आहेत त्यापेक्षा 3 ते 4 पटीने अधिक नाट्यगृह असली तरी सर्व कडे सर्व नाटके
हाऊसफुल्ल असतील.

जर आपल्याला या www.marathidrama.com वेबसाईट बद्दल काही सूचना असतील आम्हाला न संकोचता संपर्क करा.

आमचा संपर्क :
अजय रावते

रावते हाऊस ,डी /21,दहावा रस्ता,चेंबूर, मुंबई-400071
मोबाईल नंबर: 7678043564

Email:marathidrama71@gmail.com